नवी दिल्ली – भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेले आहेत. लडाखमधील पाँगाँग त्सो परिसरात चिनी सैन्य घुसखोरीचे वारंवार प्रयत्न करत असल्याने वातावरण अगदीच स्फोटक बनलले आहे. त्यातच आता चीनचे भारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस आले आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.