मुंबई: ‘ठाकरे ब्रॅण्ड’ची आठवण देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घालणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘ठाकरे ब्रॅण्डची चिंता तुमच्यापर्यंत ठेवा. तुमचा आजचा लेख राजसाहेबांच्या उल्लेखामुळंच सगळीकडं व्हायरल होतोय हे लक्षात ठेवा,’ असा चिमटा खोपकर यांनी राऊतांना काढला आहे.