मनसेच्या संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला ,तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म ?

मुंबई : मुंबईसाठी मराठी माणसांनी एक होण्याची वेळ आली आहे असं आवाहन करणारे व राज ठाकरे यांनाही साद घालणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मनसेनं उत्तर दिलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाभारतातील एक प्रसंग सांगून राऊतांना टोला हाणला आहे.
‘ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व मुंबईवरून सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी घातली राज ठाकरेंना सद

संदीप देशपांडे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या आवाहनावर काय बोलायचं ते आमचे पक्षाध्यक्ष बोलतील, असं सांगून देशपांडे यांनी भूतकाळातील काही गोष्टींची आठवण करून देत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. ‘२००८ साली जेव्हा आम्ही परप्रांतीयांच्या विरोधात लढा देत होतो, तेव्हा संसदेत शिवसेनेचे खासदार गप्प होते. एकही खासदार तेव्हा मनसेच्या बाजूने बोलला नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलून द्या अशी भूमिका घेऊन आम्ही आंदोलन करत असताना शिवसेना गप्प होती. रातोरात मुंबई महापालिकेतील आमचे सहा नगरसेवक चोरले. २०१७ आणि २०१४ साली आम्ही बाहेरच्या लोकांविरुद्ध लढत होतो, तेव्हा राज साहेबांनी शिवसेना साद घातली, पण शिवसेना गप्प राहिली होती, हे देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिलं.’महाभारतात कर्णाचं चाक चिखलात रुतलं तेव्हा तो श्रीकृष्णाला धर्माची आठवण करून देऊ लागला. त्यावेळी कृष्णानं उच्चारलेल्या ‘तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म?’ या वाक्याची आठवण देशपांडे यांनी शिवसेनेला करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!