स्वदेशी लशीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, ‘भारत बायोटेक’ची घोषणा

नवी दिल्ली : देशात करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचं दिसून येतंय. याच दरम्यान देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेकची करोना लस ‘कोवॅक्सीन’शी निगडीत एक खुशखबर समोर येतेय. ‘कोवॅक्सीन’ लशीचं प्राण्यांवर वापर यशस्वी ठरल्याचं ‘भारत बायोटेक’कडून जाहीर करण्यात आलंय. ‘कोवॅक्सीनची प्राण्यांवर झालेल्या चाचणीच्या परिणामांची घोषणा करताना भारत बायोटेकला अभिमान वाटतोय. हा परिणाम लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये सुरक्षात्मक प्रभाव प्रदर्शित करतो’ असं ट्विट भारत बायोटेककडून करण्यात आलंय.

https://twitter.com/BharatBiotech/status/1304413008756531201

गैर-मानव सस्तन प्राण्यांवर (उदा. माकड, वटवाघूळ इत्यादी) करण्यात आलेल्या अभ्यासात कोवॅक्सीनच्या रोग प्रतिकारक क्षमतेचा परिणाम दिसून येतो. ‘कोवॅक्सीन’ माकडांमध्ये विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी अॅन्टीबॉडीज विकसित करण्यात यशस्वी ठरल्याचंही भारत बायोटेकनं स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!