मराठा आरक्षण: ‘ते तुमचेच वकिल होते’, फडणवीसांवर अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई 11 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या संदर्भात (Maratha reservation issue) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.  काही ठिकाणी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत यावरूनच राज्यातील मंत्री उपसमितीचे प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस हे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

रणनीती चुकली असं फडवणीस सांगतात पण फडणीस यांनी जजमेंट वाचावे ,फडवणीस सरकारच्या काळात ज्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली तेच वकिल याही वेळी होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही लोकांना मराठा आरक्षणाशी देणेघेणे नाही.  मराठा संघटनांच्या नावाखाली राजकारण करायचा आहे.

मराठा आरक्षण  हा विषय कोर्टात सोडवला जाऊ शकतो, रस्त्यावर आंदोलन करून हा विषय सोडवला जाऊ शकत नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. शरद पवार यांनी अध्यादेश काढून मराठा आरक्षण टिकवता येईल असे मत व्यक्त केले त्यावर चव्हाण यांनी या संदर्भात कायदेशीर विचार करून काय करता येते हे पाहून निर्णय घेऊ असं मत व्यक्त केलं.

बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी फडवणीस यांना दिली आहे यावरून चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर टोला लगावला आहे, फडणवीस यांनी तात्काळ बिहारला जावेेेेेेे निवडणूक जिंकावे असा टोला चव्हाण लगावला.

कंगना राणावत या राजकीय नेत्या नाहीत की  त्यांच्यावर भाष्य करणेे गरजेच नाही. या विषयाला फार महत्त्व देऊन मोठे करण्यात अर्थ नाही. असं मत व्यक्त करत त्यांनी त्या विषयाला महत्त्व देणार नसल्याचे संकेत दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!