सांगली | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLA Gopichand Padalkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पडळकर यांनी मिरजेतील शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केली होती.गोपीचंद पडळकर सोमवारी अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले. मात्र मंगळवारी सकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजलं.
पडळकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ते अधिवेशनाला गेले नाहीत. कोणतीही लक्षणे त्यांना नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत.