रिया चक्रवर्तीला अटक एनसीबीची मोठी कारवाई

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (sushant sing rajput death case) रविवारी सुरू असलेल्या चौकशीत एनसीबीची टीम रियाला अटक करेल असं वाटत होतं मात्र रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आलं. अखेर मंगळवारी संध्याकाळी एनसीबीने रियाला (Riya Chkravarty) अटक केली. जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) उडी घेतली आहे, तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केलं आहे. एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा (KPS Malhotra) यांनी अटकेला दुजोरा दिला आहे.

हे वाचा : कंपनीने घेतला मोठा निर्णय ,PUBG भारतात पुन्हा घालणार धुमाकूळ …

रियाचा अटकेचा मेमो होतोय तयार

एनसीबीच्या टीमने सुरुवातीला रियाच्या अटकेचा मेमो तयार केला. अटकेचा मेमो तयार झाल्यावर तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाईल. सध्या ती एनसीबी पथकाच्या ताब्यात आहे. असं सांगितलं जात आहे की, आता कागपत्रांची जुळवाजुळ सुरू आहे आणि त्यानंतर रियाची सरकारी इस्पितळात मेडिकल आणि करोना टेस्ट केली जाईल. एनसीबीच्या कार्यालयात रियासाठी तात्पुरते लॉकअप करण्यात आलं आहे. न्यायालयात नेईपर्यंत रियाला तिथेच ठेवण्यात येणार आहे.

हे वाचा : सावधान ! माशीला मारायला गेला अन् घरात झाला स्फोट…

आतापर्यंत रियाने ती कोणतंही व्यसन करत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचं मान्य केलं. तसंच ती स्वतः अमली पदार्थांचं सेवन करत नसून फक्त सुशांतसाठी मागवायची असंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. आज मंगळवारी मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे.

सुशांतच्या कुटुंबियांनी डॉक्टरांविरोधात दाखल केली तक्रार

सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुसान वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांतने डॉक्टरांचा सल्ला जरी घेतला असला तरी ही गोष्ट फार गोपनिय असते. याचा खुलासा केला जात नाही. डॉक्टरांनी वैद्यकीय तत्त्वांचं उल्लंघन केलं, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

अंमली पदार्थ टोळीविरुद्ध जोमानं कारवाई सुरू झाली आहे. या अंमली पदार्थ टोळीची नस तंतोतंत ओळखणाऱ्या मराठी अधिकाऱ्याकडं या कारवाईचे नेतृत्व आहे. समीर वानखेडे यांनी वर्षभरापासून कैलाश राजपूत टोळीचे पंख कापण्यास सुरुवात केली आहे.समीर वानखेडे हे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रीय युनिटमधील सहसंचालक आहेत.

रियाचा भाऊ शौविक (Shauvik Chkravarty) व सुशांतसिंहचा व्यवस्थापक सॅम्युएलचा अंमली पदार्थांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने मुंबईत विविध ठिकाणी छाप्याची कारवाई सुरू केली आहे. समीर वानखेडे यांनी डीआरआय अंतर्गत या अंमली पदार्थ टोळीवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. त्यांना टोळीची पूर्ण माहिती असल्याने या कारवाईसाठी वानखेडे यांना खास डीआरआयमधून बोलविण्यात आले आहे. त्याअंतर्गतच धडाकेबाज कारवाई सध्या सुरू आहे.

One thought on “रिया चक्रवर्तीला अटक एनसीबीची मोठी कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!