कंगणा आमची मुलगी आहे, तिला सुरक्षा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

मुबंई : शिवसैनिक कधी पोकळ धमक्या देत नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत आणि कंगणा यांच्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी कंगणा मुंबईत आल्यावर त्यावेळी काय होणार?, म्हणजेच शिवसेना काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला हिमाचल प्रदेश सरकार सुरक्षा देणार असल्याचं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितलं आहे. कंगणाने हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्राने मला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती.

हिमाचलच्या मुलीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कंगनाच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली होती, त्यामुळे आम्ही कंगनाला सुरक्षा देत आहोत, असं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे.

कंगणाच्या वडिलांसोबत फोनवरून संपर्क साधला होता. हिमाचल सरकार पूर्णपणे कंगणाला सुरक्षा देणार आहे. त्यासाठी हिमाचल प्रदेशच्या पोलिस महासंचालक यांना तसे आदेश देण्यात आले असल्याचंही जयराम ठाकूर यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!