नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ मी पुस्तक लिहिणार- एकनाथ खडसे

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी म्यान केलेली आपली तलवार पुन्हा एकदा उपसली आहे. त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपण ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार(i will write book on devendra fadnavis) असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. माझ्यावर धादांत खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला आहे.

मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची तिकिटं कापली. याच कारणामुळे राज्यात भाजपचे सरकार येऊ शकले नाही, असंही खडसे म्हणाले.

जो व्यक्ती विरोधी पक्षनेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर माझ्याविरोधात एक षडयंत्र रचलं गेलं. ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एकही आरोप झाला नाही, मात्र सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप केले गेले, हा त्या षडयंत्राचाच भाग होता, असा आरोपही खडसेंनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!