नवी दिल्लीः मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप मध्ये खूप सारे नवीन फीचर्स येत आहेत. यात काही फीचर्सवर कंपनी खूप दिवसांपासून काम करीत आहे. कंपनी काही देशात व्हॉट्सअॅप पेमेंट्स सिस्टम तयार करीत आहे. तसेच एक नवीन एक्सपिरियन्स मेसेजेस फीचरला टेस्ट करीत आहे. तसेच याशिवाय, लवकरच व्हॉट्सअॅप कॉल टर्मिनेट केल्यास किंवा पुन्हा ग्रुप कॉल्स रिसीव केल्यान नवीन टोन्स युजर्संना ऐकायला मिळणार आहे.
WhatsApp आपल्या युजर्संसाठी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता कंपनी अनेक नवीन फीचर्सवर काम करीत आहे. व्हॉट्सअॅपमधील रिंग टोन्स आणि साऊंड सुद्धा नवीन आणण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे.लवकरच युजर्संना नवीन रिंगटोन्स ऐकायला मिळू शकते.
व्हॉट्सअॅप फीचर्स आणि अपडेट्सला ट्रॅक करण्यासाठी WABetaInfo च्या माहितीनुसार लेटेस्ट व्हॉट्सअॅप व्हर्जन 2.20.100.22 बीटा फॉर आयफोन मधून नवीन फीचर्सची माहिती समोर आली आहे. ज्याची टेस्टिंग केली जात आहे. व्हॉट्सअॅप पेमेंटला प्लॅटफॉर्म खूप आधीपासून टेस्ट केले जात आहे. लेटेस्ट बीटा मध्ये ही फीचर दिसत आहे. व्हॉट्सअॅप आपला नवीन पेमेंट सिस्टम खास करून स्पेन साठी खूप चांगले करीत आहेत. आतापर्यंत हे फीचर युजर्संना मिळत नव्हते.
नवीन टोन आणि साउंड मिळणार
नवीन व्हॉट्सअॅप व्हर्जन युजर्संसाठी नवीन टोन्स आणू शकते. तसेच अनेक जुने बग्स सुद्धा नवीन अपडेट्समध्ये फिक्स केले जावू शकते. व्हॉट्सअॅप एक्सपिरियन्स मेसेजेस फीचर सुद्धा युजर्संना आगामी काळात मिळू शकते. या फीचर्सच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवण्यासोबतच ते किती वेळात डिलीट होणार हे ठरवतील. मेसेज आपोआप डिलीट होईल. हे फीचर सर्वात आधी ग्रुप चॅटमध्ये दिले जाईल.