आयकर विभाग कशाप्रकारे या सर्व प्रकरणांची तपासणी करत आहे. काळा पैसा सफेद करण्यासाठी (Money Laundering) अशाप्रकारे अनेक खाती उघडल्याचा समज आयकर विभागाकडून केला जाऊ शकतो. भारतामध्ये अद्याप असा कोणताही कायदा नाही आहे की, जो कोणत्याही व्यक्तीला कितीही बँकांमध्ये (Bank) खाते उघडण्यास मनाई करेल.
हे वाचा : करोना लसीसंबंधी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा : आम्ही करून दाखवलं !
जर तुम्ही कोणतेही कारण नसताना अनेक बँकांमध्ये खाते उघडले असल्यास (Multiple Bank Account) तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता. जर तुम्ही यापैकी कोणते खाते वापरत नसाल तर ते त्वरित बंद करा. अशाप्रकारे अधिकचे खाते बंद न केल्यास तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या (Income Tax Department) रडारवर येऊ शकता.
मात्र आयकर विभागाच्या (Income Tax Department) नजरेत अशाप्रकारे मल्टिपल अकाऊंट्स आल्यास त्याला डमी खाते समजले जाऊ शकते. एखाद्या खोट्या कंपनीशी ते खाते संबंधित नाही ना असा तपास केला जाऊ शकतो. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बँकांकडून नियमित स्वरूपात सर्व सूचना आयकर विभागाकडे दिल्या जात आहेत. कोणती व्यक्ती मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन करते आहे, याबाबत बँकेकडून आयकर विभागास माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे एकाच पॅन नंबरवर किती खाती आहेत, याची माहिती देखील एका क्लिकवर मिळू शकते. जर एखादी व्यक्ती वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडत असेल तर ते संशयास्पद ठरू शकते.
काही वर्षांपूर्वी बँकांमध्ये सेंट्रलाइज्ड बँकिंग सिस्टिम नव्हती. तेव्हा शहरात काम करणारे व्यक्ती त्या त्या शहरात त्यांचे बँक खाते उघडत असत कारण दुसऱ्या शहरातील बँकेतून साधा चेक क्लीअर होण्यासाठी जास्त वेळ जात असे. आता क्षणार्धात पैसे ट्रान्सफर (transfer) होतात. असे असून देखील वेगवेगळी खाती असल्यास ते संशयास्पद असू शकते.
आयकर विभागाने ET ला दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये एका व्यक्तीला पकडण्यात आले होते, ज्याने खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये मिळून 80 खाती उघडली होती. आयकर विभागाला असा संशय होता की त्याने 380 कोटींचे मनी लाँड्रिंग केले आहे.
त्याचप्रमाणे नोटबंदीच्या वेळी दिल्लीमध्ये एक व्यक्ती सापडला होता जो काश्मीरी गेटच्या मोटर पार्ट्स मार्केटमध्ये काम करायचा आणि त्याचे 20 हून अधिक बँक खाती होती. त्याचा कोणताही पत्ता देखील नव्हता. बाजार बंद झाला की तो तिथेच झोपायचा. मात्र नोटबंदीच्या काळात त्याच्या खात्यामध्ये लाखोंचा व्यवहार झाला.