रायगडमधील महाड येथील इमारत दुर्घटनेत बीडच्या किशोर लोखंडेने तब्बल 40 तास जेसीबी चालवत बचावकार्यात मदत केली. त्यामुळे त्याच्या या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफ मध्ये नौकरी द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतने तसा ठराव पास करून याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांनी दिली आहे.
किशोरने न झोपता अखंडपणे 40 तास पॉकलेन चालवण्याचं काम केल. कोसळलेल्या इमारतीचा मलबा हा जास्त नव्हता पण त्याखाली माणसं होती म्हणून काळजी घेऊन काम करणार्या किशोरने एक दिवस, दोन दिवस नव्हे तर तब्बल 40 तास पोकलेन चालवून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढले. पोकलेन चालवताना कुणी माणूस तरी खाली येणार नाही ना हा विचार करूनच किशोरच्या पोटामध्ये गोळा उठायचा.
किशोरच्या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफ मध्ये नौकरी द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.