१८०० रुपयेवाल्या व्हायरल काकूंची राज्य सरकारकडून गंभीर दखल

मुंबई: १८०० रुपयाच्या हिशेबावरून एका तरुणासोबत वाद घालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला आहे. सर्वच जण या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. व्हिडिओवरून राजकीय टीकाटिप्पणीही सुरू झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घतेली आहे.

ठाकूर यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यात त्या म्हणतात, ‘घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये.

‘महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही सरकारच्या पुढील एक आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!