फेसबुक आणि भाजपचं साटलोटं काँग्रेसने लिहिले, झुकरबर्गना पत्र

एक लेख अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापण्यात आला लेखात फेसबुकची भारतीय टीम पक्षपात करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या वादग्रस्त पोस्टबद्दल नियमांचं काटेकोर पालन होत नसल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात म्हटलं होतं.

त्यानंतर 27 ऑगस्टला टाइम मासिकामध्ये ‘फेसबुक टाइज टू इंडियाज रुलिंग पार्टी कॉम्प्लिकेट इट्स फाइट अगेन्स्ट हेट स्पीच’ (Facebook’s Ties to India’s Ruling Party Complicate Its Fight Against Hate Speech) या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात फेसबुकचं मेसेंजिंग व्हॉट्स आणि सत्तारुढ भाजपदरम्यान साटलोटं असल्याचा आरोप करण्यात आला होता.

हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरही काँग्रेसनं फेसबुकच्या संस्थापकांना 17 ऑगस्टला पत्र लिहून आरोपांची पडताळणी करण्याची विनंती केली होती. भारतात आपली कंपनी योग्यपद्धतीनं काम कसं करेल, हे पाहावं असंही काँग्रेसनं आपल्या पत्रात म्हटलं होतं.

काँग्रेसनं आता ‘टाइम’ मासिकामधील लेखाच्या हवाल्यानं फेसबुकला पत्र लिहून म्हटलं आहे, की इतक्या कमी कालावधीत दुसऱ्यांदा पत्र लिहावं लागलं, कारण एका प्रतिष्ठित अमेरिकन प्रकाशनानं त्यांच्या लेखात पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे.

याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनी ट्वीट केलं 

 Rahul Gandhi again attacks Modi govt on Facebook hate speech row

पत्रात लिहिलं आहे की, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुमची कंपनी या प्रकरणी कोणती पावलं उचलत आहेत याची माहिती आम्हाला देण्यात यावी. भारतातील आपल्या कारभारामध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनीनं कृती आराखडा बनवावा, असंही काँग्रेसनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

कोणत्याही परदेशी कंपनीला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी देशात सामाजिक वैमनस्य पसरविता येऊ नये म्हणून आपण कायदेशीर आणि न्यायालयीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!