Unlock 4.0 : १ सप्टेंबरपासून या गोष्टीं सुरु

Unlock 4.0 : करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असुन, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

अनलॉक 4 मधील महत्वाचे मुद्दे | Key points in Unlock 4

  • 7 सप्टेंबरपासून देशात रेल्वे सेवा सुरू होणार
  • 21 सप्टेंबरपासून सोशल अॅकेडमिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी 100 लोकाचं बंधन असणार आहे.
  • 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थियटर्स उघडण्यास संमती.
  • शाळा आणि महाविद्यालय 30 सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार.
  • 9 वी ते 12वीचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा, महाविद्यालया जाऊ शकतात. मात्र, यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
  • कंटेनमेंट झोन मध्ये चित्रपटगृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आणि थियटर्स बंदच राहणार आहेत. याठिकाणी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.
  • लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी सध्या असलेली माणसं जमवायची मर्यादा २० सप्टेंबर पर्यंत कायम राहील. २१ सप्टेंबर पासून १०० माणसांना परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!