सीतारामन यांच्या ‘कोरोना देवाची करणी’ वक्तव्यावर चिदंबरम म्हणाले ‘अर्थमंत्री मेसेंजर ऑफ गॉड’

नवी दिल्ली: करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. ट्विटर आणि फेसबुकवरही याचसंदर्भातील चर्चा सुरु होत्या. यावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जोरदार टीका केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सीतारामन यांना ‘मेसेंजर ऑफ गॉड’ म्हणत टीका केली आहे.

Read This ‘देवाच्या करणी’मुळे केंद्र हतबल… ‘मोदी विष्णूचा ११ वा अवतार’; महाराष्ट्रातील नेत्याचं ‘ते’ ट्विट व्हायरल

चिदंबरम यांनी ट्वीट अर्थमंत्रीवरती टीका केली आहे . ते ट्विट मध्ये असे बोले ‘जर ही महामारी देवाची करणी आहे तर 2017-18, 2018-19 आणि 2019-20 यादरम्यानच्या अर्थव्यवस्थेच्या अयोग्य व्यवस्थापनाचं वर्णन कसं कराल? अर्थमंत्री ‘मेसेंजर ऑफ गॉड’ ( याचं उत्तर देतील का?, असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीतारामन यांच्यावर निशाणा साधला.

सर्‍या पर्यायांतर्गत राज्यांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्यास सांगितलं जातं. हे केवळ वेगळ्या नावानं दिलं जाणारं कर्ज आहे. यानंतर सर्व आर्थिक बोजा हा राज्यांवर पडतो. केंद्र सरकार आर्थिक जबाबदाऱ्यांपासून दूर पळत आहेत. हा विश्वासघात आणि कायद्याचं उल्लंघनही असल्याचं देखील चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!