बीड: कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरं मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. मंदिरं दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरं खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.
घंटानाद आंदोलन करत हे मंदिर उघडण्यात बालाजी मंदिर उघडण्यात आलेले आहे . दार उघड उद्धवा दार उघड अशे बोर्ड घेऊन आंदोलन करण्यात आले.
हे वाचा मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत भाजप राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन
बीड मध्ये आज सकाळी भाजपचे 100 ते 150 पदाधिकारी बालाजी मंदिर परिसरामध्ये येऊन त्यांनी घोषणा देत मंदिर उघडले दार उघड उद्धवा दार उघड अन्यथा आम्हाला दार उघडावं लागेल अशी भूमिका घेत यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिर उघडले.