जपानचे पंतप्रधान शिंजो आबे राजीनामा देणार? हे आहे कारण

असं बोललं जात आहे की, बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे शिंजो आबे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे (Prime Minister Shinzo Abe) गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे आता त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, शिंजो आबे औपचारिकरित्या यासंदर्भात घोषणा करू शकतात. दरम्यान, जपानचे पंतप्रधान असणाऱ्या शिंजो आबे यांना गेल्या आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.(Japanese Prime Minister Shinzo Abe to resign?)

जपानमधील एनएचके टेलिव्हिजन आणि इतर मीडिया रिपोर्टनुसार, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या आरोग्याच्या अस्वास्थामुळे पंतप्रधान पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात बोलताना सांगितले की, ‘अद्याप या रिपोर्टवर कोणतंच अधिकृत मत व्यक्त केलं जाऊ शकत नाही. परंतु, असं मानलं जात आहे की, आबे पार्टी मुख्यालयातील उच्च अधिकाऱ्यांना भेटत होते. दरम्यान, शिंजो आबे यांनी 2007मध्येही आपल्या आजारपणामुळे आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, गेल्या सोमवारी शिंजो आबे यांनी पंतप्रधान कार्यकाळाची 8 वर्ष पूर्ण केली आहेत. तसेच जपानमधील सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की, शिंजो आबे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच त्यांनी शिंजो आबे राजीनामा देणार असल्याचं वृत्त एक अपवा असल्याचं सांगितलं आहे. तसेच पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिंजो आबे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!