नवी दिल्ली | काही वर्षांपासून ‘स्टारकिड्स’ हे नाव प्रत्येकाच्या कानावर पडत आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुर याचं नाव विविध सोशल माध्यमात प्रचलित आहे.
स्टारकिड्स मुलांचा जन्म सर्वसामान्यच आहे, पण तैमुरची आई असल्यामुळे बेगम आणि बाबा नवाब आहे. त्यामुळे मुलाचे सर्व हट्ट पुरवण्यात ते कुठेही कमी नाही.
तैमुरची आजी अभिनेत्री शर्मिला टागोर काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाल्या,”समाज माध्यमांमध्ये अनेक दिवसांपासून अनुष्का गरोदर आहे, अशा बातम्या फिरत होत्या आणि त्यावर चर्चाही व्हायची. विराट आणि अनुष्काला मूल झाली की, लोक तैमुरला विसरतील. कारण तेव्हा त्यांचे लक्ष विराट-अनुष्काच्या मुलावर असेल.”
शर्मिला टागोर सहजच हे बोलून गेल्या होत्या. पण काही महिन्यांनंतर ही बातमी खरी ठरली. विराट-अनुष्का यांनी आनंदाची बातमी दिली. एका शॅम्पूच्या जाहिरातीनिमित्त २०१३ ला दोघे भेटले होते. तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरवात झाली आणि ११ डिसेंबर २०१७ रोजी दोघांनी लग्न करून संसाराला सुरूवात केली.