अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी वान नदीच्या पात्रात बनवल्या जाणाऱ्या गावठी हातभट्टी वर टाकलेल्या धाडीत २ लाख ५४ हजार ५०० रुपयाचा मुद्येमाल नष्ट केला असुन सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई नजिकच्या वानानदी पात्रामध्ये अवैधरित्या गुळमिश्रीत रसायन साठवुन गावठी हातभट्टीची दारु तयार बनवली जात आसल्याची गोपनीय माहीती मिळाल्यावरुन मा. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्यार अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस उपअधीक्षक राहुल धस अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथील पो.नि.राऊत व सोबत महिला पोलीस उप निरीक्षक पवार, पोह/७४८ मिसाळ, पोह/४५३ भुसारी, पोना/ १६२७ राऊत, पोना/४२९ आघाव, पोना/१२९१ डोंगरे, पोकॉ/७१८ शेख, पोकों/१९०६ अनारुपे, पोकॉ/ १३५७ जाधव, होमगार्ड/५५१,३६९ यांच्या सह वानानदी पात्रामध्ये संयुक्तरित्या छापा मारुन गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी बनवलेले ३६०० लिटर गुळ मिश्रीत रसायन किमती तसेच साहीत्य लोखंडी बॅरल, प्लॅस्टीक कॅन्ड, दारु वाहतुकीसाठी वापरात आणलेला घोडा प्राणी असा एकुण २,५४.५००/-रुपयाचा मुद्येमाल नष्ट करुन आरोपी नबी जुम्मा रेगीवाले, चाँद लाला रेगीवाले दोन्ही, सुभान चंदु गवळी, विजय किशोर कांबळे, गफार कासम गवळी, अकबर बाबु प्पुवाले, पाशा सत्तार चौधरी सर्व रा.गवळीपुरा अंबाजोगाई यांच्या विरुध्द पो.स्टे.अंबाजोगाई ग्रामीण येथे प्रो.गु.र.न.३२४/२० कलम ६५(अ),(फ)(सी),(डि),(ई),६६(१), (बी),८१,८३ म.प्रो.का.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास चालु आहे.