मुंबई | अनैसर्गिक युतीची सत्ता आहे. ती जास्त काळ टिकत नाही, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
आम्ही तिघाडी सरकारच्या कामाकडे लक्ष देत नाही. त्यांच्यात खूप आंतरविरोध आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचं तितके दिवस चालेल. एक दिवस ते जाईन, असं फडणवीस म्हणाले.
ही अनैसर्गिक युती आहे. अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी कधी टिकली नाही, असं सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत. तसंच काँग्रेसने आत्मचिंतन करावं. काँग्रेस पक्षाला आपला अध्यक्ष देखील ठरवता येत नाही, असा चिमटा देखील त्यांनी काढला.