राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह

नाशिक: सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली.

यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी करोना संसर्गावर मात केली आहे. त्या पाठोपाठ आता कोकाटेंचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकाटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी करोना टेस्ट करवून घेतली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती कोकाटे यांच्या निटवर्तीयांसह आरोग्य यंत्रणेतील विश्वसनीय सूंत्रानी दिली. त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींचा वेगवेगळ्या कामानिमित्तानं अनेक लोकांशी संपर्क येत असतो. करोना साथीच्या काळात जवळपास सर्वच आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये सक्रिय होते. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा कार्यकर्ते, अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत होता. त्यातूनच मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होत आहे. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर मात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!