तारिक गार्डन ही पाच मजल्यांची इमारत सोमवारी संध्याकाळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. या इमारतीमध्ये ४१ सदनिका होत्या. त्यातील १८ सदनिका बंद होत्या, तर २३ सदनिकांमध्ये ८६ रहिवासी राहत होते. ८६ पैकी ६० नागरिक बाहेर गेले होते. त्यामुळे किमान २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. २६ पैकी ११ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. अजूनही तीन जण ढिगाºयाखाली अडकले असण्याची शक्यता आहे.
महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता १४ झाली आहे. ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली होती. दुर्घटनेनंतर रात्री उशिरा आठ जणांना ढिगाºयातून बाहेर काढण्यात आले होते. त्यातील एकाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसºया जखमीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात १२ मृतदेह ढिगाºयाखालून बाहेर काढले.
मृतांची नावे
सय्यद हनीफ समीर (४५), नविद झमाले (२५), नौशीन नदीम बांगी (३५), आदी शेखनाग (१४), मतीन मुकादम (१७), फातिमा शौकत अलसुलकर (५८), रोशनबी दाऊदखान देशमुख (७०), इसमत हसीम शेखनाग (३५), फातिमा शाफिक अन्सारी (४३), अल्लतीमस बल्लारी (२७), शौकत आदम अलसुलकर (५०), आयेशा नदीम बांगी (७), रुकया नदीम बांगी (२), (एकाची अद्याप ओळख पटलेली नाही)
जखमींची नावे
स्वप्निल शिर्के (२९), नवीद दस्ते (३४), फरीदा शिराज कोर (६५), नमिश शोकत अलसुलकर (२९), संतोष सहानी (२४), जयप्रकाश कुमार (२४), दीपक कुमार (२१), मोहम्मद नदीम बांगी (६), मेहरूनिसा अब्दुल हमिद काझी (७५).