बीड : शाहुनगर भागातील रहिवाशी माणिकराव कुलकर्णी वांगीकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. माणिकराव कुलकर्णी हे गत काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई, नातवंड असा परिवार होता. विकास उमापूरकर यांचे ते सासरे होत.