हुकूमशहा किम-जोंग उन कोमात की मृत्यू? माजी नेत्याच्या दाव्यानंतर खळबळ

सियोल, 24 ऑगस्ट : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एप्रिलमध्ये किम यांची प्रकृती खराब असल्याचे समोर आल्यानंतर किम यांनी जगसमोर येत, सर्वांना चकित केले. मात्र आता दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम डे-जंगचे अधिकारी असलेले चांग सॉंग-मीन यांनी किम जोंग-उन कोमामध्ये असल्याचा दावा केला.

याआधी एप्रिलमध्ये अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही, असे वृत्त दिले होते.

किम जोंग उनच्या यांच्या आरोग्यबाबत या सर्व चर्चा सुरू असताना ते एका दोन वेळा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. मात्र दक्षिण कोरियाच्या या माजी नेत्यानं केलेल्या दाव्यानंतर आता किम यांच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, चांग सॉंग-मीन यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, किम कोमामध्ये आहेत, पण ते जिवंत आहेत. सध्या किंम जोंग यांची बहिण किम यो जोंग हिच्याकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. किम हे 36 वर्षांचे असून 2011पासून ते उत्तर कोरियाचे हुकूमशहा आहेत.

याआधी अशी बातमीही समोर आली होती की किम जोंग उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेबद्दल खूप नाराज आहेत. हेच कारण आहे की त्याने अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या बहिणीला दिली आहे.

किम जोंग यांनी त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या आहेत. किम यो यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. किम योच्या प्रवेशानंतर असे मानले जाते की किम जोंग उननंतर ती आता सर्वात ताकदवान नेता बनली आहे. किम यो जोंग हे किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!