आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

बीड : शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये शाळा मिळाली आहे, त्यांच्या पालकांना 31 तारखे पर्यंत प्रवेश निच्चित करावा लागणार आहे. दर वर्षी आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. त्यानुसार यंदा 17 मार्च रोजी सोडत काढण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घ्याचा आहे. 31 ऑगस्ट नंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला प्रवेश दिला जाणार नाही. 31 ऑगस्ट नंतर वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत पाधान्य देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करु नये. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 31 ऑगस्ट पुर्वी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत आपला प्रवेश निच्चित करायचा, असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. कोरोना संर्सगामुळे प्रत्यक्ष पालकांना शाळेत जाता आले नाही, तर त्यांनी ईमेल किंवा मोबाईल द्वारे मुख्याध्यापकांशी संपर्क करून प्रवेश घ्यायचा आहे. तसेच शाळांनी त्यांच्या आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे. त्यातील प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करुन किंवा ईमेल द्वारे संपर्क करुन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करायची आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!