हिंदुस्तानी भाऊवर फेसबुकची कारवाई; अकाउंट केलं बंद

हिंदुस्तानी भाऊ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा तो बॉलिवूड सेलिब्रिटींवर अक्षेपार्ह टीका देखील करतो. या आक्षेपार्ह व्हिडीओजमुळे नुकतंच त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर आता फेसबुकनेही त्याचं अकाउंट सस्पेंड केलं आहे. हिंदुस्तानी भाऊ विरोधात वाढत्या तक्रारींमुळे फेसबुकने ही कारवाई केली आहे.

Instagram takes down Hindustani Bhau’s account after Kunal Kamra tweets to Mumbai Police

नेमकं प्रकरण काय आहे?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांना टॅग करत लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. लोकांना भडकावणं हा एक गुन्हा आहे आणि हे जमावासाठी केलं जात आहे. यामुळे हिंसाचार होऊ शकतो, असं कुणाल कामरानं म्हटलं होतं. कुणालच्या या तक्रारीला एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक आणि फराह अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला होता. अखेर वाढत्या तक्रारीमुळे इन्स्टाग्रामपाठोपाठ आता त्याचं फेसबुक अकाउंटही सस्पेंड करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!