भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नियंत्रित करत असून त्याद्वारे द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वॉल स्ट्रीट जनरल अहवालाद्वारे केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून, आम्ही आमची धोरणे कशी लागू करतो त्यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होत आहे. आम्ही हे आरोप गांभीर्याने घेतले असून आम्ही कोणत्याही रूपात द्वेष आणि धर्मांधपणाचा निषेध करतो. यापूर्वीही आणि आताही वादग्रस्त पोस्ट हटवण्याचं आमचं काम सुरुच राहणार आहे. दरम्यान, अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जनरल या प्रमुख वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या अहवालामुळे भारतीय राजकीय वर्तुळ आणि सोशल मीडियाच्या जगात मोठी लढाई सुरु झाली आहे. या अहवालाचा दाखला देत, भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नियंत्रित करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हा वाद एवढा वाढला की फेसबुकला स्पष्टीकरण द्यावं लागलं.
फेसबुक इंडियाचे वाइस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग्ज डायरेक्टर अजीत मोहन यांनी ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटलं आहे, की फेसबुक एक खुलं आणि पारदर्शी माध्यम आहे आणि तो कोणताबी पक्ष किंवा विचाराधारेचं समर्थन करत नाही. या प्लेटफॉर्मवर लोकांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. काही दिवसांपूर्वी आमच्यावर पक्षपाताचा आरोप केला जात आहे. मात्र, आम्ही कोणत्याही प्रकारचा द्वेश आणि कट्टरतेचा विरोध करतो.