Corona to the two on Silver Oak
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार(sharad pawer) यांचा बंगला सिल्व्हर ओकवर दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे दोघेही जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे.
दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.