स्वातंत्र्यदिनाला पोलिसांना देण्यात येणाऱ्या पदकांवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाराष्ट्र भाजपला टोला लगावला आहे.सुशांत सिंग आत्महत्या चौकशी प्रकरणावरून बिहार पोलिस विरूद्ध महाराष्ट्र पोलिस यांच्यात चांगलाच सामना रंगला. यावरून राजकीय पक्षांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्यामुळे व त्याचवेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक भाजपच्या नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल, अशा शब्दात सावंत यांनी भाजपला टोमणा लगावला आहे.बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्यामुळे महाराष्ट्र भाजपला झालेलं दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना!, असं म्हणत सावंत यांनी भाजपाल चिमटा काढला आहे.