असंख्य चाहत्यांना काल धक्कादायक दिवस होता धोनीने काल रात्री आपली रिटायरमेंट घोषित केली होती पण धोनीला शेवटचा एक सामना खेळण्याची संधी भेटण्याची शक्यता आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील धोनीचं कौतुक केलंय आणि सोबतच एक मागणी देखील बीसीसीआयकडे केलीय. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धोनीचं आतापर्यंतच्या खेळासाठी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘धोनी हा संपूर्ण देश आणि झारखंडचा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा’, अशी मागणी सोरेन यांनी केली आहे.
झारखंडच्या सुपुत्राला निळ्या जर्सीत आता आम्ही पाहू शकणार नाही. पण देशवासीयांचं अद्याप समाधान झालेलं नाही. माहीसाठी एक फेअरवेल मॅच रांचीत व्हायलाच हवी. या मॅचची सगळी व्यवस्था झारखंड पाहील’, असं आवाहन चक्क झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी BCCI ला केलं आहे.