बीड : स्वातंत्र्य दिनानिमित्त सीआरपीएफ चे सहा. समादेशक सादिक अली नुसरत अली सय्यद यांना 20 20 गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल चे राष्ट्रपती पोलिस पदक नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्य राखीव पोलिस बल पुणे परिक्षेत्राचे पोलिस उप-महानिरीक्षक नविनचंद्र रेडी व समादेशक नीवा जैन यांनी सय्यद यांचे अभिनंदन केले.
सादिक सय्यद हे मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील रहिवाशी आहेत. ३ जुलै १९८४ रोजी बीड पोलिस दलात पोलिस शिपाई पदावर ते भरती झाले. त्यांच्या सेवा कालावधीमध्ये अमरावती, पुणे शहर, पुणे ग्रामिण व लोहमार्ग व पुणे येथे राखीव पोलिस उप निरीक्षक व राखीव पोलीस निरीक्षक होते. तसेच पोलिस
हे वाचा- ज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही
प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी पोलिस उप अधिक्षक बाहयवर्ग या पदावर काम केले आहे. सध्या ते सहाय्यक समादेशक वानवडी रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १ येथे सहा. समादेशक पदावर कार्यरत आहेत. ३६ वर्षाच्या पोलीस सेवेच्या कारकीर्दीमध्ये त्यांना ३१० बक्षिस व २५ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. सय्यद यांनी महाराष्ट्र राज्यात व राज्या बाहेर लोकसभा,
विधानसभा, नक्षल बंदोबस्त व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कवायत, जुडो, कराटे प्रशिक्षण देण्याचे काम केलेले आहे. आपले कर्तव्य सचोटीने प्रामाणिकपणे व अत्यंत जबाबदारीने पार पाडल्याने त्यांच्या सेवा अभिलेखाचा विचार करुन मे २०१७ मध्ये पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले होते. यंदा राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.