शहीदांच्या कुटुंबियांकडे सत्ताधारी मंत्री आणि प्रशासनाने केलेले दुर्लक्ष हे दुर्दैवी आणि अक्षम्य-प्रितम मुंडे

बीड: जिल्हयातील शहीदांच्या कुटुंबियांकडे सत्ताधारी मंत्री आणि प्रशासनाने केलेले  दुर्लक्ष हे दुर्दैवी आणि अक्षम्य  आहे. जनतेच्या प्रश्नांविषयी केवळ मोठमोठ्या गप्पा मारणा-या या मंत्र्यांना शहीदांच्या कुटुंबियांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी खंत व्यक्त करत या कुटूंबांना कधी न्याय देणार असा सवाल खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

 पाटोदा तालुक्यातील भाग्यश्री राख गेली दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत आहेत. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्त केली असतानाही त्यांच्या फाईलवर अद्याप सहीच झालेली नाही.

हे वाचा- उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 4499 पदांकरिता ऑनलाईन अर्ज.

पाटोदा तालुक्यातील शहीद जवान तुकाराम राख यांना 2010 मधील ऑपरेशन रक्षकमध्ये वीरमरण आले. स्वतःचा पती गेल्यानं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही वीरपत्नी भाग्यश्री कुटूंबाचा गाडा चालवतच राहिल्या. शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. पण अधिकारी कुठे ही सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत परंतू आज या, उद्या या असे म्हणून प्रशासन वेळ मारून नेण्यापलिकडे काहीही करत नाही. शासन निर्णयानुसार जमीन मिळण्यासाठी जिल्हयातील  शहीदांच्या अशा १५ कुटुंबियांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. भाग्यश्री राख यांना प्रशासना बरोबरच सत्ताधारी मंत्र्यांनी देखील आठ दिवसांत प्रकरणं निकाली काढतो म्हणून आश्वासन दिले पण काहीच केले नाही. शेवटी या सर्वाना कंटाळून त्यांनी उद्या स्वातंत्र्यदिनी जीव देण्याचा इशारा दिला आहे. 

हे वाचा- मालेगाव येथे ४२७ पदांची भरती २०२०.

धनंजय मुंडे या प्रकरणावर काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या

नाहीतर धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!