अन्यथा जनावरे सांभाळा;राजू शेट्टींचा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा दुध उत्पादकांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दुधाला अनुदान द्या, अन्यथा दूध उत्पादकांची जनावरे संभाळा, अशी मागणी करीत (दि. १७) ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाची घोषणा केली आहे. जनावरांसह या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यापूर्वी राजू शेट्टी(raju shetti) यांनी २१ जुलै रोजी आंदोलन केले होते. परंतु त्यावर शासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने पुन्हा आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने तातडीने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये प्रमाने अनुदान जमा करावे. राज्यात रोज १कोटी १९ लाख लिटर दूध उत्पादन होते. त्यापैकी ६७ लाख लिटर दूध पॅकिंग होते. उर्वरित दुधासाठी लिटरला पाच रुपये अनुदान द्यावे. दोन महिन्याला साधारणतः दिडशे कोटी रुपये लागतील पण त्यामुळे ४६ लाख दुध उत्पादकांना दिलासा मिळेल.

गेल्या महिन्यात राज्यभर दूध बंद आंदोलन करण्यात आले. मात्र आद्यपही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. दूध दरप्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारला पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दुग्धविकासमंत्री सुनील केदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांना सुद्धा पत्र लिहिले. दूध दरप्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहे. केंद्राने २३ जूनला दहा हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा जो निर्णय घेतलाय, तो तातडीने मागे घ्यावा.

निर्यातीसाठी सबसिडी द्यावी. दुग्धजन्य पदार्थावरील पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के असलेली जीएसटी मागे घ्यावी. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती कमी होतील. ग्राहकांनाही दिलासा मिळेल. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!