जालन्यामध्ये आज कोरोनाचे अर्धशतक

जालना शहरातील SRPF निवासस्थानातील 35 जनांसह जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी एकूण 50 नवीन कोरोना बाधीत रूग्णांची भर पडली आहे. काल बुधवारी रात्री उशिरा 47 रुग्ण आणि आताचे 50 अशा एकूण 97 रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या 3295 इतकी झाली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान,138 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 50 रुग्णांमध्ये तब्बल 35 जण हे SRPF निवासस्थानातील असून त्यापाठोपाठ किंनगाव येथील 4, वडीगोद्री, घनसावंगी येथील प्रत्येकी 2 तसेच मेहकर,धाकलगाव,टाकळी बाजड ता.भोकरदन, परतूर,गुरुपिंप्री ता.घनसावंगी, देव हिवरा,सिंदखेड येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना बाधीत असून काल बुधवारी रात्री कोरोना बाधीत अहवाल प्राप्त झालेल्या एकूण 47 रुग्णांमध्ये भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर येथील 10 रुग्णांचा समावेश असून वडोद तागडा,आडगाव भोपे,रेणुकाई पिंपळगाव, विझोरा येथील प्रत्येकी 2, लेहा येथील 3 तर वाढोना व पोखरी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.बदनापूर तालुक्यातील काळेगाव येथील 3 तर देवगाव येथील 2 जणांचा समावेश आहे.सिव्हिल देऊळगाव राजा,किनहोला,शेलगाव जि. बीड,पांगरी गोसावी,राजनेवाडी ता.घनसावंगी, येथील प्रत्येकी 1 तर जालना शहरातील कन्हेय्यानगर येथील 6,करवा नगर येथील 2 तर सरस्वती कॉलनी गणपती मंदिर परिसर,आनंदवाडी राम मंदिर,SRPF, आणि जुना जालना भागातील सराफ नगर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा यात समावेश आहे अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. आजपर्यंत एकूण 3295 कोरोना बाधीत रुग्णसंख्या झाली असून त्यापैकी 1919 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!