पार्थ पवार इममॅच्युअर त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे.”

दरम्यान शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं असलं तरी त्यांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचंही म्हटलं आहे.पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं.

हेही वाचा  – MPSC साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम

पार्थ यांच्या ‘या’ भूमिकांमुळे शरद पवार नाराज?
– पार्थ पवार यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला शुभेच्छा पत्र
– सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट
– पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात पुढाकार घेतल्याचा राजकीय आरोप
– लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय नाहीत

हेही वाचा  –   UPSC IES परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात

One thought on “पार्थ पवार इममॅच्युअर त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!