बीड जिल्ह्यातील 5 शहरे 12 ऑगस्टपासून 10 दिवसांसाठी लॉकडाऊन

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

प्रतिनिधी । बीड दि. 9 ः बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही पाच शहरे 12 ऑगस्टच्या रात्री 12 पासून 21 ऑगस्टपर्यंत पुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा ते १२ दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यातील  बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजमध्ये १० दिवसाची संचारबंदी लागून करण्यात आली आहे. ही संचारबंदी दि. १२ ते २२ ऑगस्ट दरम्यान सदील शहरे बंद राहाणार आहेत. यामध्ये दुध विक्री घरपोहच सकाळी ७ वाजल्यापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत राहणार आहे. खाजगी व शासकीय रुग्णालय केवळ रुग्णांलयाशी सलग्ण औषध दुकाने (संबस सर्वांनी त्यांना लागणारे औषधे दि. ११ ऑगस्ट २०२० पर्यंत खरेदी करुन घ्यावी) माध्यमे सुरु राहतील. घरगुत्ती गॅस सेवा संबधीत एजन्सी धारकांनी आपले एजन्सीचा गणवेश परीधान करावा व ओळखपत्र बाळगावे. यासह इतर नियम लागू करण्यात आलेेल आहेत.

One thought on “बीड जिल्ह्यातील 5 शहरे 12 ऑगस्टपासून 10 दिवसांसाठी लॉकडाऊन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!